शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आमच्याबददल

माध्यमांत अलीकडे मोठा बदल झाला आहे. वर्तमानपत्र हेच माहितीचा एकमेव स्रोत आहे. ही समजूतही आता गळून पडली आहे. माध्यमांत नवे तंत्रज्ञान आल्याने सर्वच बाजूने आपल्यावर माहितीचा अक्षरश: प्रहार होतो आहे. विचार करायला संधीही मिळणार इतका माहितीचा ओघ आहे. असे असतानाही ही माध्यमे आजूबाजूच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या घटना मांडताना कुठेतरी अडखळतात, असेच चित्र आहे. ही वस्तुस्थितीही आहे. प्रत्येक माध्यमांना स्वत:च्या मर्यादा आहेत. काहींसाठी या मर्यादा राजकीय आहे, तर काहींसाठी त्या आर्थिक आहेत. विशेषकरून वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्या हे बातम्या, घटना आपल्यापर्यंत पोचविण्याचे मोठे माध्यम आहे. अनेक घटनांत ही माध्यमे तटस्थ राहू शकत नसल्याचे दिसून येते. हा निश्चितच दोषारोप नव्हे. प्रत्येक घटकाला काही अपरिहार्य बाजू असतातच.  
    गडचिरोली वार्ता आपल्यापर्यंत आणताना नेमक्या याच बाजूचा मुख्यत्वे विचार केला. या माध्यमातून जे इतर माध्यम देवू शकत नाही, ते आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. अर्थात सत्याला धरून. या संकल्पनेत सर्वसामान्य नागरिक, वाचक मध्यवर्ती ठेवण्यात आला आहे. 
    ..त्याला काय वाटत
    ...तो काय म्हणतो
    ...त्यालाही काही सांगायचं आहे का
    ....त्यालाही सर्वसामांन्यापर्यंत कुठलं गुपित पोचवायचं आहे का?
    आतापर्यंत अबोल राहिलेल्या या नागरिकांच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण सुरू करायची आहे. शहराचा नागरिक स्वत:हून एक जागरूक पत्रकार म्हणून काम करणार आहे. त्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून स्थान देण्यात येणार आहे. खासकरून युवकवर्गांकडून आम्हाला अधिक सहभाग आवश्यक वाटतो, तर ज्येष्ठांनी आमची मार्गदर्शनाची गरज पूर्ण करावी. 
    
    चला तर, विचाराची, विकासाची एक नवीन प्रक्रिया सुरू करू या...............आपल्या सोबतीने.. आपल्या बरोबर....आपल्या खांद्याला खांदा लावून

  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना