मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

भाजपचे चंद्रपूर जिल्हा सोशल मीडियाप्रमुख अमोल कोंडबत्तुनवार यांचे अपघातात निधन

Friday, 29th December 2017 10:14:50 PM

गडचिरोली, ता.३०: भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सोशल मीडियाप्रमुख अमोल कोंडबत्तुनवार यांचे आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नागभिड-नागपूर मार्गावरील भुयार गावाजवळ अपघातात निधन झाले. राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले अमोल कोंडबत्तुनवार हे म...

सविस्तर वाचा »

काँग्रेसच्या मोर्चाची एटापल्लीच्या एसडीओ कार्यालयावर धडक

Friday, 29th December 2017 05:29:40 AM

एटापल्ली,ता.२९: शेतकरी, मजूर व तालुकावासीयांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शासनाला जागे करण्यासाठी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शालिक गेडा...

सविस्तर वाचा »

अवघ्या १.७ टक्के भारतीयांनी भरला प्राप्तीकर

Wednesday, 27th December 2017 12:58:33 AM

गडचिरोली, ता.२७: देशातील लोकसंख्येच्या अवघ्या १.७ टक्के भारतीयांनी २०१५-१६ मध्ये प्राप्तीकर भरला आहे. तुलनेत या कर निर्धारण वर्षांत प्राप्तीकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या मात्र वाढली असून, ती ४.०७ कोटी झाल्याचे प्राप्तीकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. प्राप्तीकर विभागा...

सविस्तर वाचा »

सरकारने कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी-काँग्रेस प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे

Tuesday, 26th December 2017 09:00:05 AM

गडचिरोली, ता.२६: सरकार सातत्याने दलित व आदिवासींवर अन्याय करीत असून, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरुन सरकारने या घटकांवर कुठाराघात केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे  प्रवक्ते व अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे य...

सविस्तर वाचा »

आदिवासींसाठी असलेले कायदे लागू करण्याबाबत प्रशासन उदासीन-प्रभू राजगडकर

Tuesday, 26th December 2017 08:01:06 AM

गडचिरोली, ता.२६: सरकारने आदिवासींच्या हितासाठी पेसा व अन्य कायदे केले असले, तरी प्रशासन मात्र या कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीन  आहे, अशी टीका कवी प्रभू राजगडकर यांनी केली. गडचिरोली येथे आयोजित ग्रामसभांच्या राष्ट्रीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते. यावेळी मंचावर पत्रक...

सविस्तर वाचा »

संसदीय कायद्यापेक्षा विधिमंडळाचे कायदे मोठे होताहेत या देशात-माजी केंद्रीय मंत्री अरविंद नैताम

Monday, 25th December 2017 03:58:53 AM

गडचिरोली, ता.२५: महत्प्रयासाने संसदेने मंजूर केलेल्या पेसा कायद्यामुळे आदिवासींना संसाधनावरील मालकी हक्क मिळाले. परंतु छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये विधिमंडळे स्वतंत्र कायदे बनवून आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालत आहे.  संसदेच्या कायद्यापेक्षा विधिमंडळाचे कायदे मोठे ठरत अस...

सविस्तर वाचा »

दोन ठिकाणी पोलिस-नक्षल चकमकी, एक नक्षलवादी ठार

Sunday, 24th December 2017 08:45:05 AM

गडचिरोली, ता.२४: आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्यानजीकच्या सांड्रा(छत्तीसगड)व जारागुडम जंगलात पोलिसांची नक्षल्यांशी चकमक उडाली. या चकम...

सविस्तर वाचा »

तीन जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Saturday, 23rd December 2017 08:11:18 AM

गडचिरोली, ता.२३: गडचिरोली व छत्तीसगडमधील विविध दलममध्ये कार्यरत ३ जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सतीश उर्फ हिळमा कोसा होळी, पाकली उर्फ पगणी अडमू पोयामी व मनोज उर्फ दशरथ सखाराम गावडे अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा...

सविस्तर वाचा »

लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Saturday, 23rd December 2017 05:33:27 AM

हेमलकसा, ता.२३: थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी साकारलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचा ४४ वा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शैक्षणिक जत्रेचेही आयोजन करण्यात आले होते. चार दिवस येथे कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. बाबा आमटे यांनी ४४ वर्षांपूर्वी भामरागडच्या निबीड अरण्यात हेमलकसा ...

सविस्तर वाचा »

विहिरीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, शंकाकुशंकांना उधाण

Saturday, 23rd December 2017 08:26:40 AM

गडचिरोली, ता.२३: दोन चिमुकल्या मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास पोर्ला येथे घडली. दरम्यान, मातेने पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केल्याची चर्चा गावात असल्याने शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. अनुप किशोर राऊत(६) व अनुष किशो...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना