![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
कालेश्वर मंदिर आंध्रप्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीच्या तिरावर सुप्रसिद्ध कालेश्वर मंदिर आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथून विस्तीर्ण पात्र असलेली नदी पार करून नावेद्वारे कालेश्वर मंदिराकडे जावे लागते. या मंदिरात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व शेजारच्या छत्तीसगड राज्यातील भाविकही पूजेसाठी येत असतात. कालेश्वर हे पवित्र तीर्थस्थान असून, 12 ज्योतिलिगांपैकी एक आहे. येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. तेथे लाखो भाविक पूजा व स्नानासाठी येतात. या ठिकाणी गोदावरी व प्राणहिता या नद्यांचा संगम झालेला आहे |