
2001 चे जनगणनेनूसार गडचिरोली जिल्हयाची एकूण लोकसंख्या 970294 इतकी असून त्यापैकी 491101 पूरुष व 479193 स्त्रिया आहेत. सर्वात जास्त म्हणजे 17.06 टक्के (165514) लोकसंख्या चामोर्शी तहसिलीत आहे. त्यानंतरचा क्रमांक गडचिरोली तहसिलीचा असून त्या तहसिलीची लोकसंख्या 13.02 टक्के (126313) इतकी आहे. त्यानंतर अनुक्रमे अहेरी तहसिल 10.69 टक्के (103759), आरमोरी 9.36 टक्के (90846), कुरखेडा 8.03 टक्के (77936), धानोरा 7.97 टक्के (77346), देसाईगंज 7.85 टक्के (76154), सिरोंचा 7.19 टक्के (69773), कोरची 4.20 टक्के (40736) , मुलचेरा 4.08 टक्के (39611), व सर्वात शेवटी भामरागड 3.26 टक्के (31679) अशी लोक संख्येची विभागणी आहे. 2011 चे जनगणनेनूसार गडचिरोली जिल्हयाची एकूण लोकसंख्या 1071795 इतकी असून, त्यापैकी 542813 पूरुष व 528982 स्त्रिया आहेत. सर्वात जास्त म्हणजे 16.62 टक्के (178163) लोकसंख्या चामोर्शी तहसिलीत आहे. त्यानंतरचा क्रमांक गडचिरोली तहसिलीचा असून त्या तहसिलीची लोकसंख्या 13.64 टक्के (146238) इतकी आहे. त्यानंतर अनुक्रमे अहेरी तहसिल 10.82 टक्के (115987), आरमोरी 9.14 टक्के (97957), कुरखेडा 8.00 टक्के (85697), देसाईगंज 7.80 टक्के (83600),एटापल्ली 7.72 टक्के (82751) धानोरा 7.69 टक्के (82389), सिरोंचा 6.94 टक्के (74385), मुलचेरा 4.28 टक्के (45834) , कोरची 4.00 टक्के (42844), व सर्वात शेवटी भामरागड 3.35 टक्के (35950) अशी लोक संख्येची विभागणी आहे.
लोकसंख्येची घनता
गडचिरोली जिल्हयात लोकसंख्येची घनता 63 इतकी आहे. जिल्हयात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता देसाईगंज तहसिलीत 396 इतकी आहे तर सर्वात कमी म्हणजे 18 इतकी एटापल्ली तहसिलीची आहे.तसेच 2011 चे जनगणनेनुसार गडचिरोली जिल्हयात लोकसंख्येची घनता 74 इतकी आहे.
लोकसंख्येचे ग्रामीण वर्गीकरण
जिल्हयाची ग्रामीण लोकसंख्या मोठया प्रमाणात 903033 इतकी असून ती एकूण लोकसंख्येच्या 93.06 इतके प्रमाणात आहे. जिल्हयात पुरुषांची संख्या 456647 असून पूरुषांची टक्केवारी 50.57 इतकी आहे तसेच स्त्रीयांची संख्या 446386 इतकी असून टक्केवारी 49.43 इतकी आहे. ग्रामीण भागात लोकसंख्यंची घनता 59 टक्के असून स्त्री पुरुष प्रमाण 978 इतके आहे. जनगणनेनुसार 2011 नुसार जिल्हयाची ग्रामीण लोकसंख्या मोठया प्रमाणात 953858 इतकी असून ती एकूण लोकसंख्येच्या 89.00 इतके प्रमाणात आहे. जिल्हयात पुरुषांची संख्या 482740 असून पूरुषांची टक्केवारी 50.61 इतकी आहे तसेच स्त्रीयांची संख्या 471118 इतकी असून टक्केवारी 49.39 इतकी आहे. स्त्री पुरुष प्रमाण 976 इतके आहे.
लोकसंख्येचे नागरी वर्गीकरण
जिल्हयाची नागरी लोकसंख्या 67261 असून जिल्हयात देसाईगंज व गडचिरोली अशा दोन नगरपरिषदा असून गडचिरोली न गरपालीका "ब" मध्ये व देसाईगंज न गरपालीका "क" वर्गात समावेश होते. 2001 चे जनगणनेनुसार अहेरी व आलापल्ली ही शहरे नागकरीकता वगळण्यात आली आहेत. शहरी लोकसंख्येची जिल्हयाच्या एकूण लोकसंख्येशी टक्केवारी फक्त 6.93 टक्के आहे. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण 38.89 टक्के इतके आहे. देसाईगंज नगरपरिषदेची लोकसंख्या 24793 व गडचिरोली नगरपरिषदेची लोकसंख्या 42468 मिळून एकूण शहरी लोकसंख्या 67261 इतकी आहे. 1982 ला गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आल्या नंतर नगर परिषद गडचिरोलीच्या क्षेत्रात कर्मचारी व कार्यालयांचे संख्येत ब-याच प्रमाणात वाढ झाली असून 1991 ते 2001 या कालावधीत दशवर्षीय वाढीचे प्रमाण 23.25 टक्के आहे.
जनगणनेनुसार 2011 नुसार जिल्हयाची नागरी लोकसंख्या 117937 असून जिल्हयात देसाईगंज व गडचिरोली अशा दोन नगरपरिषदा असून गडचिरोली नगरपालीका "ब" मध्ये व देसाईगंज नगरपालीका "क" वर्गात समावेश होते. 2011 चे जनगणनेनुसार कुरखेडा,चामोशी,अहेरी व स्ीरिोचा ही शहरे नागरीत समाविष्ट करण्यांत आली आहेत. शहरी लोकसंख्येची जिल्हयाच्या एकूण लोकसंख्येशी टक्केवारी फक्त 11.00 टक्के आहे. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण 45.23 टक्के इतके आहे. देसाईगंज नगरपरिषदेची लोकसंख्या 28820 व गडचिरोली नगरपरिषदेची लोकसंख्या 54195 मिळून एकूण शहरी लोकसंख्या 117937 इतकी आहे. 1982 ला गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर नगर परिषद गडचिरोलीच्या क्षेत्रात कर्मचारी व कार्यालयांचे संख्येत ब-याच प्रमाणात वाढ झाली आहे
लोकसंख्येतील स्त्री - पुरुष प्रमाण
जिल्हयातील स्त्रियांचे दर हजारी पुरुषांशी प्रमाण 976 इतके आहे. राज्याचे हेच प्रमाण 922 इतके आहे. जिल्हयातील नागरी भागातील प्रमाण 952 तर ग्रामीण भागातील प्रमाण 978 इतके आहे. जनगणनेनुसार 2011 नुसार जिल्हयातील स्त्रियांचे दर हजारी पुरुषांशी प्रमाण 975 इतके आहे. राज्याचे हेच प्रमाण 925 इतके आहे. जिल्हयातील नागरी भागातील प्रमाण 963 तर ग्रामीण भागातील प्रमाण 976 इतके आहे.
दर्शक
जिल्हा
क्षेत्र (चौ.किमी.)
14412
तालुक्यांची संख्या
12
नगरांची संख्या
सांविधिक नगरे
2
प्रगणित नगरे
4
महसुली गावांची संख्या
1675
लोकसंख्या
एकूण
1071795
पुरूष
542813
स्त्री
528982
दशकातील वाढीची टक्केवारी (2001-2011)
10.46
लोकसंख्येची घनता (व्यक्ती प्रति चौ.किमी.)
74
लिंग अनुपात
975
बालकांचे लिंग अनुपाताचे प्रमाण (0-6 वर्षे)
956
एकूण लोकसंख्येशी लोकसंख्येची टक्केवारी
अजा
11.2
अज
38.3
ग्रामीण
11
साक्षरतेचा दर (7 वर्षे आणि त्यावरील)
व्यक्ती
70.55
पुरूष
80.21
स्त्री
60.66
शहरी
ग्रामीण