
गडचिरोली जिल्हयाच्या भौगोलीक क्षेत्रांपैकी 75.95% क्षेत्र वनांनी आच्छादीत आहे. एवढे मोठे क्षेत्र जंगलाखाली असणारा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा हा एकमेव आहे. जिल्हयामध्ये सामाजिक वनिकरणाचा एक भाग उघडला असून त्यांचे मार्फत रोपवाटीका स्थापाकरण्यात येत असते त्यानुसार सन 2011-12 मध्ये 99.10 चौ.कि.मी.क्षेत्रामध्ये 62 लाख रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हयाचे 2010- 2011 मधील वनक्षेत्र 12295 चौ.कि.मी.इतके आहे. या वनक्षेत्रापैकी 516 चौ. कि.मी. क्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंहामंडळाचे असून, वनविभागाचे 10778 चौ.कि.मी.क्षेत्र राखीव व 1371 चौ.कि.मी. क्षेत्र संरक्षित आहे. व 146 चौ.कि.मी. क्षेत्र अवर्गीकृत आहे.
जिल्हयाच्या उत्पादनाच्या या दृष्टीने विचार केला असता वनसंपत्तीचा महत्वाचा वाटा आहे. 2011-2012 या वर्षामध्ये वनाचे एकूण उत्पन्न 477.15 कोटी झाले आहे. जंगलातील उत्पादनात इमारती लाकूड, बांबू, जळाऊ लाकूड, बिडीपाने, गवत व डिंक इत्यादींचा समावेश आहे. जिल्हयात इमारती लाकडापासून 224.57 कोटी , बांबूपासून 6.06 कोटी , बिडीपानांपासून 239.94 कोटी महसूल प्राप्त झाला. जिल्हयात सागवानही अत्यंत मौल्यवान प्रजात आहे. अहेरी व आलापल्ली येथील सागवान जगात प्रसिध्द आहे. तसेच आलापल्ली व भामरागडच्या क्षेत्रात बांबू मोठया प्रमाणात आढळते. कागद कारखाना यासाठी कच्चा माल म्हणून बांबूचा वापर केला जातो. तसेच वनात साग, बीजा, ऐन, शिसम, हळदू, मोह, चार, खैर, धावडा, बेहडा, तेंदू, आवळा इत्यादी इमारतीसदृष्य वृक्ष आहेत. जिल्हयात वडसा, गडचिरोली, भामरागड, आलापल्ली व सिरोंचा असे पाच वन विभाग आहे.
जिल्हयात कोसा रेशमाच्या उत्पादनाचा व्यवसाय फार पुर्वीपासूनच म्हणजेच सुमारे 200 वर्षापेक्षाही अधिक परंपरेने चालत आलेला आहे. आधुनिक काळात जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ व विदर्भ विकास महामंडळाद्वारे कोसा उत्पादन करण्यात येते. खादी ग्रामोद्योग विभागामार्फत तुतीचे मलबेरी सिल्कचे उत्पादन होत असते.
2010-2011 या वर्षात टसर रेशीम उद्योगात एकूण 154210 अंडी पुजाचे उत्पादन करण्यात आले असून 503 लाभार्थीनी याचा लाभ घेतलेला आहे. 27 हेक्टर मध्ये झाडे लावण्यात आली असून 5101632 नग कोषउत्पादन करण्यात आले आहे. व त्याची किंमत 49.58 लाख इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 4.97 लाखाने वाढ झाल्याचे दिसुन येते.