
लघु उद्योग
महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या या जिल्हयात औद्योगीकरण नगण्य आहे. जिल्हयात आष्टी येथे बल्लारपूर इंडस्ट्रिजचा मोठा कारखाना स्थापन करण्यात आला असून त्यात 436 कामगार आहे. वडसा येथे जेजाणी पल्प व पेपरमिल हा मध्यम आकाराचा कारखाना अस्तित्वात असून उत्पादन प्रक्रीया सुरु आहे. लघुउद्योग क्षेत्रात या जिल्हामध्ये वडसा येथे लाहेरी फर्टीलायझरचा कृषिधन खत कारखाना स्थापन करण्यात आला असून त्याची क्षमता 20.00 मे. टा आहे. जैरामानगर येथे जैराम फॉस्फेट आणि कस्तुरचंद फॉस्फेट हे कारखाने सुरु आहेत. याशिवाय इतरही लघुद्योग असून त्यामध्ये प्रामुख्याने भात गिरण्यांचा समावेश आहे. विटा व कौले बनविणारे तीन उद्योग या जिल्हयात असून सिमेंट, पाईप व जाळया बनविणारे दोन उद्योग आहेत. तेलघाणी, मिरची दळण व स्टिल फेब्रीकेशन इत्यादी उद्योग आहेत हे उद्योग मुख्यत्वे करुन गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी व चामोर्शी या भागात किंवा त्यांचे आसपास आहेत.
औद्योगीक वसाहत
गडचिरोली जिल्हयात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी प्रशासकीय संकूलाच्या शेजारी औद्योगीक वसाहत स्थापन करण्यात आली आहे. ही वसाहत 81.73 हेक्टर जागेत विकसीत करण्यात येणार आहे. त्यापैकी गडचिरोली 81.73 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले असुन 36.84 हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात आला आहे. विकसीत करण्यात आलेल्या 130 प्लाटपैकी 95 प्लॉट वितरीत करण्यात आले असून बेकरी उद्योग, फेब्रीकेशन फेक्शरी, टाईल्स सिमेट, डिस्ट्रिब्युशन, ट्रासफॉर्मर, ट्रासफॉर्मर रिपेरींग, राईसमील, कोलकांडी, टॉसफॉरमर कट्रोल पॅाल, ऑईल मिल, इंजनिअरींग वर्क्स, ऑईसस्क्रीम, केरोसीन साठवणूक, व विडप्रासेसिंग इत्यादी प्रकारचे 14 उद्योग सुरु करण्यात आले आहेत. तसेच अहेरी येथे 9.20, कुरखेडा येथे 16.48 आणि धाननेरा येथे 11.80 हेक्टर जागेत औद्योगीक वसाहत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. याशिवाय इतर तहसिलीच्या ठिकाणीसुध्दा औद्योगीक वसाहत स्थापन करण्याचे प्रस्तावीत आहे.