
जिल्हयामध्ये खाजगी डॉक्टर्स प्रामूख्याने गडचिरोली व देसाईगंज अशा ठिकाणी आहेत. तथापि त्यातील एम.बी.बी.एस. अथवा एम.डी. किंवा एम.एस. डॉक्टर्स अगदी बोटावर मोजण्याइतके आहेत. बहुसंख्य डॉक्टर्स पदविका धारण करणारे असून त्यात होमीआपॅथीचे, प्रमाणपत्राद्वारे किंवा अन्य प्रकारे पदविका प्राप्त करुन घेवून व्यवसाय करणारेच अधिक सापडतील त्यामूळे जिल्हा परिषदेचे दवाखाने किंवा शासकीय दवाखाने याशिवाय योग्य अशी वैद्यकीय सेवा जिल्हयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. जिल्हयात आदिवासी क्षेत्र जास्त असून काही भाग दुर्गम आहे. या भागात लोकवस्ती विरळ आहे. बहुतेक लोक पाडयावरच राहतात. त्यामूळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. यासाठी या भागात 3000 लोकसंख्येस 1 उपकेंद्र हा निकष शिथील करुन 2000 लोकसंख्येमागे 1 उपकेंद्र स्थापनेचे ने प्रस्तावित आहे. डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्यासाठी चातगांव येथे सर्च (SARCH- Society for education action and research in community health) या नावाची संस्था स्थापन करुन त्या माध्यमातुन आदिवासी भागात आरोग्यसेवा सुरु केली. विविध संशोधानांत र हजारी 121 पर्यत असलेले बालमुत्यृचे प्रमाण 35 पर्यत खाली आणण्यात त्यांना यश मिळाले. तसेच हेमलकसा, तालुका - भामरागड येथे लोकबिरादरी या संस्थेचे संस्थापक डॉ. विकास आमटे आणि डॉ. मंदा आमटे या दांपत्यांनी ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा राबविण्यात येत आहे त्यांच्या समाज सेवेबाबत भारत सरकारने सन 2002 मध्ये पदमश्री सन्मानाने गौरविले आहे.
रुग्णालय
जिल्हयात 2011-2012 या वर्षात जिल्हयामध्ये 13 रुग्णालये, 5 दवाखाने व 45 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यामध्ये 222 डॉक्टर्स आणि 616 परिचारीका काम करीत होते. रुग्णालये, दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रामधून 916 खाटांची सोय उपलब्ध आहे. त्यापैकी 453 खाटा स्त्रियांसाठी आहेत. गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात इमारतीचे काम आणि डॉक्टर्स व कर्मचारी निवासस्थान आहे. तेथील रुग्णालयात 244 खाटांची सोय असून सर्व अद्यावत यंत्र सामुग्री बसविण्यात आली आहे.
जन्म-मृत्यु प्रमाण
2011-12 अखेर नोंदविलेल्या जन्मांची संख्या 20426 असून त्यापैकी 11012 पुरुष, 9414 स्त्रिया आहेत. तसेच नोंदलेल्या मृत्यूंची संख्या 6890 असून त्यात 4137 पुरुष व 2753स्त्रिया आहेत. त्यापैकी बाल मृत्युंची संख्या 870 इतकी आहे.