![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासकीय विभाग व रचना
गडचिरोली जिल्ह्याचे मुख्यालय गडचिरोली येथे असून जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या नागपुर विभागात मोडतो. हा जिल्हा विदर्भ या भागात येतो. जिल्हाधिकारी कार्यालय हे गडचिरोली शहरापासून ४ कि.मी. अंतरावर चंद्रपूर मार्गावर वसलेले आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १४४१२ चौ.कि.मी. आहे. गडचिरोली जिल्हा हा प्रशासकीय दृष्ट्या एकूण सहा उपविभागात विभागलेला आहे. गडचिरोली, देसाईगंज (वडसा), अहेरी, कुरखेडा, चामोर्शी, एटापल्ली हे जिल्ह्याचे सहा उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुके समाविष्ट केलेले आहेत. जिल्ह्यात एकूण १६८८ राजस्व गावे असून ४६७ ग्राम पंचायती, १२ पंचायत समीती व एक जिल्हा परीषद आहे. जिल्ह्यात एकूण दोन नगरपालिका असून त्या गडचिरोली व देसाईगंज (वडसा) येथे आहेत
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हा परिषद
पंचायत समिती
वनविभाग
नगरपालिका
|