शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

९ ऑगस्टला गडचिरोलीत जागतिक आदिवासी दिन समारोहाचे आयोजन

Monday, 3rd August 2015 04:57:52 AM

 

गडचिरोली, ता.३: ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व विविध आदिवसी संघटनांच्या संयुक्त विद्ममाने रविवारी ९ ऑगस्ट रोजी दुपारी गोंडवन कलादालनात जागतिक आदिवासी दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते होणार असून, खा.अशोक नेते हे सहउद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, सेवानिवृत्त अधिकारी प्रभू राजगडकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनायक इरपाते, शिक्षणाधिकारी एन.जे.आत्राम, जनजाती चेतना परिषदेचे प्रकाश गेडाम, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, जि.प. चे माजी समाजकल्याण सभापती केसरी उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, आदिवासी विकास प्रकल्पाचे दशरथ कुळमेथे, ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. हेमंत मेश्राम, हलबा संघटनेचे शालिक मानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आदिवासी समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माधव गावड, सदानंद ताराम, आनंद कंगाले, प्रा.रमेश हलामी, भगवान आत्राम, सुनीता मरसकोल्हे, पितांबर कोडापे आदींनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VW50A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना