मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

११ ऑक्टोबरला भाट समाजाचा नागपुरात मेळावा

Friday, 9th October 2015 05:53:02 AM

 

गडचिरोली, ता.९: अखिल भारतीय भाट समाजाचा मेळावा रविवारी ११ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग चौकानजीकच्या जैन कलार सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती भाट समाजाचे जिल्हाध्यक्ष विलास दशमुखे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विलास दशमुखे यांनी सांगितले की, ११ ऑक्टोबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतिदिनी हा मेळावा होणार आहे. या दिवशी सकाळी ८ वाजता नागपूरचे महापौर प्रवीण दरडे यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येईल. या शोभायात्रेत गडचिरोली जिल्हयातील वसा(पोर्ला) व मुरखळा(माल) येथील गुरुदेव सेवा मंडळाचे भजन मंडळ सहभागी होणार आहेत. या मेळाव्याच्या प्रारंभी सकाळी ११ वाजता भाट समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तर उपवर व वधूंचा परिचयही होणार आहे. दुपारी दोन वाजता केंद्रीय विमुक्त भटक्या जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष भि.रा.इदाते यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ.कृष्णा खोपडे, आ.सुधाकर कोहळे, भाट समाजाचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी उपस्थित राहतील. अतिथींच्या हस्ते भाट समाजाच्या वेबसाईटचाही शुभारंभ्‍ा करण्यात येणार आहे. भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, या दोन प्रमुख मागण्या मेळाव्यात रेटून धरण्यात येणार आहेत.

भाट समाजाचे गडचिरोली जिल्हयातील नेते केशवराव दशमुखे, लालाजी सूर्यवंशी, मधुकर खडतकर, ज्ञानेश्वर पवार, भगवान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातून दोनशे समाजबांधव मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती विलास दशमुखे यांनी दिली. पत्रकार परिषदेला लालाजी सूर्यवंशी, प्रा. प्रकाश शिंदे, उपेंद्र निशाने, गोपाल दशमुखे, विवेक निशाने, रामचंद्र दशमुखे, प्रमोद दशमुखे उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
44256
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना