गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

देसाईगंज-आरमोरी रस्ता कात टाकणार!

Monday, 27th March 2017 06:16:29 AM

 

देसाईगंज, ता.२७: वर्षभरापूर्वी घोषित झालेल्या साकोली-वडसा-गडचिरोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामहामार्गावरील देसाईगंज-आरमोरी रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ झाला असून, येत्या काही दिवसांतच हा रस्ता पुन्हा चकाकणार आहे.

देसाईगंज-आरमोरी हा मार्ग वर्दळीचा असला, तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर अपघातही झाले आहेत. या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली होती. त्या अनुषंगाने आ.क्रिष्णा गजबे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली होती. श्री.गडकरी यांनी तत्काळ निधी उपलब्ध करुन दिला. त्यानंतर २ जानेवारीला तांत्रिक निविदा उघडण्यात आली आणि काही दिवसांपूर्वीच डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही करण्यात आली. आज आ.क्रिष्णा गजबे यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या रस्त्याच्या डागडुजीच्या कामाची अंदाजपत्रकीय किंमत १६२.२२ लाख रुपये असून, ३ महिन्यात हे काम पूर्ण करावयाचे आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SPE4K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना