शनिवार, 16 डिसेंबर 2017
लक्षवेधी :
  डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित-कोलकाता येथील इंटरनॅशनल वाईल्डलाईफ एन्व्हार्नमेंट फिल्म फेस्टीवलमध्ये पुरस्कार प्रदान             शेतकरी कामगार पक्षाच्या बैलबंडी मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक             गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूक-महाआघाडीचा दणदणीत विजय, भाजपप्रणित शिक्षण मंचचा दारुण पराभव             राज्यात गत वर्षभरात तब्बल १४ हजार ३६८ बालमृत्यू-विधानसभेत आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची माहिती             शेतकरी नष्ट व्हावा, असे सरकारला वाटते काय-विधीमंडळातील स्थगन प्रस्तावावर अजित पवार यांचा सरकारला सवाल           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन ९ मे रोजी नागपुरात

Monday, 8th May 2017 09:01:06 AM

 

गडचिरोली, ता.८: बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन मंगळवारी(ता.९) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नागपुरात होणार असल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, रेखा डोळस, स्वप्नील वरघंटे, जिल्हा परिषद सदस्य मीना कोडाप, अल्पसंख्याक आघाडीचे नेते जावेद अली उपस्थित होते.

खा.अशोक नेते यांनी सांगितले की, आपण आमदार असताना १५ वर्षांपासून वडसा-गडचिरोली लोहमार्ग व्हावा,यासाठी अविरत प्रयत्न केले. अनेकदा विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले. खासदार झाल्यानंतर लोकसभेतही वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्र सरकारने या लोहमार्गाला मंजुरी दिली. शिवाय १६१ कोटींचा निधीही लोहमार्गासाठी मंजूर केला. मागील काही महिन्यांपासून या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु असून, ती आता अंतिम टप्प्यात आहे.

या अनुषंगाने उद्या ९ मे रोजी नागपुरात लोहमार्ग विभागाने उपलब्ध केलेल्या विविध सुविधा, तसेच वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वन व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम उपस्थित राहणार असल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी दिली. उद्या भूमिपूजन होणार असल्याने विरोधकांच्या आरोपातील हवा गूल झाल्याचेही खा.नेते म्हणाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0373P
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना