गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पुराड्याचे वनपरिक्षेत्राधिकारी भगवान आत्राम यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

Monday, 22nd May 2017 07:46:54 AM

 

गडचिरोली, ता.२२: १२ वर्षांच्या सेवाकालावधीत ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता संपादित केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराडा येथील वनपरिक्षेत्राधिकारी(वर्ग २) भगवान सखाराम आत्राम(४९) यांच्याविरोधात पुराडा पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्राधिकारी भगवान आत्राम यांनी गैरमार्गाने अवैध संपत्ती जमा केल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावरुन एसीबीने श्री.आत्राम यांची गोपनीय चौकशी केली केली. भगवान आत्राम यांनी त्यांच्या नोकरीच्या सेवा काळात लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन अवैध मार्गाने बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचे गोपनीय चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांची उघड चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान भगवान आत्राम यांनी जून २००१ ते डिसेंबर २०१३ या नोकरीच्या सेवाकालावधीत ज्ञात व स्त्रोतांपासून संपादित केलेली मालमत्ता ही  ज्ञात उत्पन्नापेक्षा २१ लाख ९८ हजार ६९९ रुपये धारण केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एसीबीने त्यांच्याविरुद्ध पुराडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम १३(१)(ई)सह १३(२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे, पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलिस नाईक सतीश कत्तीवार, महेश कुकुडकार, देवेंद्र लोनबले, स्वप्नील वडेट्टभ्वार, सोनल आत्राम आदींनी ही कारवाई केली.

कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी वा कर्मचारी किंवा त्याच्या वतीने कोणी खासगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V65QO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना