शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आगीत दोन दुकाने जळून खाक

Tuesday, 23rd May 2017 02:45:04 AM

 

चामोर्शी, ता.२३: येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागून दोन दुकाने भस्मसात झाल्याची घटना घडली. यामुळे दुकानमालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सगणापूर-कान्होली मार्गावर सुभाष अक्कलवार व संजय कोमावार यांची दुकाने होती. कुणीतरी शेतातील कचरा जाळल्याने आग रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानापर्यंत येऊन पोहचली आणि दोन्ही दुकाने जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत, पंचायत समिती सदस्य धर्मशिला सहारे, सरपंच दिगंबर धानोरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग लागल्याने दोन्ही दुकानमालकांचे प्रत्येकी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी कविता भगत यांनी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UK4RW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना