शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अस्वलाच्या हल्ल्यात एक ठार, दोन जण जखमी

Tuesday, 23rd May 2017 02:55:57 AM

 

भामरागड, ता.२३: तेंदूपाने तोडावयास गेलेल्या नागरिकांवर अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल(ता.२२) दुपारी दोन वाजताच्या सुमारास मिळदापल्ली येथे घडली. राजू विजा मज्जी(४५), असे मृतकाचे, तर सौ.सोनी राजू मज्जी(४०) व मुल्ला केसा मज्जी(४०)अशी जखमींची नावे आहेत. 

हे तिघेही काल गावकऱ्यांसमवेत मिळदापल्लीच्या जंगलात तेंदूपाने तोडावयास गेले होते. पाने तोडत असताना अचानक अस्वलाने हल्ला केला. यात राजू मज्जी जागीच ठार झाला, तर सोनी मज्जी व मुल्ला मज्जी गंभीर जखमी झाले. दोघांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य अॅड.लालसू नोगोटी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतकाचे नातेवाईक व जखमींना वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अॅड. लालसू नोगोटी यांनी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8RE44
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना