गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

'त्या' नक्षलसमर्थक तेंदू कंत्राटदारांकडून आणखी १ कोटी १ लाख रुपये जप्त

Tuesday, 23rd May 2017 07:46:37 PM

 

गडचिरोली, ता.२४: नक्षल्यांना ७५ लाख रुपये नेऊन देण्याच्या तयारीत असताना सोमवारी(ता.२२)मध्यरात्री पोलिसांनी आलापल्ली येथून अटक केलेल्या तीन तेंदू कंत्राटदारांकडून आणखी १ कोटी १ लाख जप्त केले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मेच्या मध्यरात्री अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी आलापल्ली येथून पहाडिया तुळशीराम तांपला(३५), रवी मलय्या तनकम(४५), नागराज समय्या पुट्टा(३७) या चार तेंदू कंत्राटदारांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून नक्षल पत्रक व ७५ लाख रुपये रोख पोलिसांनी जप्त केले. न्यायालयाने तिघांची पोलिस कोठडीत रवानगी केल्यानंतर अधिक चौकशीदरम्यान तिघांकडून आणखी १ कोटी १ लाख जप्त करण्यात आले. ही रक्कम बोटलाचेरु येथे लपवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत या तिघांकडून १ कोटी ७६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे प्रकरणाचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A5JYJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना