शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गोपाल लाजूरकर यांची फेलोशिपसाठी निवड

Monday, 10th July 2017 05:44:50 AM

 

गडचिरोली, ता.१० सांस्कृतिक क्षेत्रात संशोधनासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या फेलोशिपकरिता चांभार्डा येथील गोपाल बाबूराव लाजूरकर यांची निवड झाली आहे. त्यांना २०१५-१६ या वर्षातील संशोधनासाठी फेलोशिप मिळणार आहे. दोन वर्षे संशोधनासाठी ही फेलोशिप दिली जाते. त्यांनी 'झाडीपट्टी मराठी नाटकातील जीवन आणि संस्कृतीचा चिकित्सक अभ्यास (निवडक नाटकांच्या संदर्भात)' हा विषय संशोधनासाठी निवडला आहे. देशभरातून दरवर्षी २०० संशोधक निवडले जातात. २०१५-१६ या वर्षासाठी राज्यातून विविध क्षेत्रातील दहा संशोधकांची निवड झाली आहे. साहित्य प्रकारात मराठी वाङ्मय उपक्षेत्रात राज्यातून झालेली त्यांची ही एकमेव निवड आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
984SR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना