शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आरमोरीचे दोन कृषी पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 17th September 2014 08:02:08 AM

 
गडचिरोली, ता़१७
शेततळे व कोल्हापुरी बंधार्‍याचे काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून कंत्राटदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरमोरी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोन पर्यवेक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आज १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी रंगेहाथ पकडून अटक केली़ वसंत वंजारी व विनोद भोयर अशी  दोघांची नावे आहेत़
तालुका कृषी विभागातर्फे शेततळे व कोल्हापुरी बंधार्‍याची कामे करण्यात येतात़ आरमोरी तालुक्यात अशाप्रकारचे काम देण्यासाठी कृषी पर्यवेक्षक वसंत वंजारी व गोविंद भोयर यांनी कंत्राटदाराला २ लाख रुपयांची लाच मागितली होती़ यासंदर्भात कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ तक्रारीअंती आज संध्याकाळी ६ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी वंजारी व भाेयर यांना सापळा रचून अटक केली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलिस अधीक्षक श्री़मतकर, उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी ही कारवाई केली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4E0E1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना