गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आरमोरीत युवकाची निर्घृण हत्या

Thursday, 18th September 2014 06:40:20 AM

 
गडचिरोली, ता़१८
आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील अरसोडा फाट्याजवळ आज(ता.१८) मध्यरात्री एका युवकाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे़ विशाल उर्फ विठ्ठल दामोधर भोयर(१८) असे मृत युवकाचे नाव असून, तो आरमोरीतील बर्डी परिसरातील इंदिरानगरातील रहिवासी आहे़ याप्रकरणी पोलिस काही संशयितांना ताब्यात घेतले आहे़
प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशाल भोयर हा बुधवारी १७ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास सायकले घरून निघाला होता़ मात्र, रात्री साडेबारा-एकच्या सुमारास अरसोडा फाट्याजवळ जिवानी राईसमिलनजीक तो अर्धनग्न अवस्थेत व रक्ताच्या थारोळत आढळून आला़ ब्रम्हपुरीकडून येणार्‍या नागरिकांना एक युवक विव्हळत असल्याचे दिसताच त्यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली़ पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन विशालला उपजिल्हा रुग्णालयात भ्ररती केले़ परंतु उपचारापूर्वीच त्याने प्राण सोडला़ चौकशीअंती त्याची ओळख पटली़ विशालचे डोके, चेहरा व शरीराच्या अन्य भागावर शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या़ घटनास्थळी मृतकाची सायकल व कपडे बाजूला ठेवल्याचे दिसून आले़
यासंदर्भात मृत विशालचा भाऊ मिथून भाेयर याने आरमोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मृत विशालचे अरसोडा येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते़ यासंदर्भात दीड महिन्यापूर्वी संबंधित मुलीच्या भावाने विशालला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे़ यावरून पोलिसांनी अरसोडा येथील मुलीच्या भावास व अन्य तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ़राहूल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे पोलिस निरीक्षक श्री़ मोरे, उपनिरीक्षक श्री़ तावाडे व त्यांचे सहकारी करीत आहेत़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ZS2S6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना