शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार, कुनघाडा बसथांब्यावरील घटना

Wednesday, 9th August 2017 08:19:11 PM

चामोर्शी, ता.१०: कुनघाडा येथून तांबाशीकडे शेती पाहण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कुनघाडा बसथांब्यावर घडली. श्रीकृष्ण वामन काटवे रा.कुनघाडा(रै)असे मृत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे.

श्रीकृष्ण काटवे यांची तांबाशी येथे शेती आहे. आज शेतीची पाहणी करण्यासाठी ते एमएच ३३ एस ७२६६ क्रमांकाच्या मोटारसायकलने कुनघाडा येथून तांबाशीकडे जात होते. एवढ्यात भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला. पोलिस पाटील दिलीप पवार यांनी चामोर्शी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक श्री.थोरात यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेऊन ट्रक पकडला.  

 

घटनेची माहिती होताच नागरिकांनी कुनघाडा बसथांब्यावर एकच गर्दी केली. कुनघाडा बसथांब्यावरील हा  महिनाभरातील दुसरा अपघात आहे.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0IV7X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना