शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अज्ञात वाहनाच्या धडकेत आयटीआय कर्मचारी ठार

Sunday, 13th August 2017 07:16:23 AM

देसाईगंज, ता.१३: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या आयटीआय कर्मचाऱ्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील पत्रे सॉ मिलजवळ घडली. शंकर मेश्राम (५२) रा. राजेंद्र वॉर्ड देसाईगंज असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

शंकर मेश्राम हे आज भल्या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कुरखेडा मार्गाने जात होते. पत्रे सॉ मिलजवळ पोहचताच एका अज्ञात वाहनाने त्यांना मागून धडक दिली. मेश्राम यांचे डोके व डाव्या कानशिलाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनास्थळानजीक कुणीही नसल्याने वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला. माहिती मिळताच प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अतुल तावाडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1EF04
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना