शनिवार, 16 डिसेंबर 2017
लक्षवेधी :
  डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित-कोलकाता येथील इंटरनॅशनल वाईल्डलाईफ एन्व्हार्नमेंट फिल्म फेस्टीवलमध्ये पुरस्कार प्रदान             शेतकरी कामगार पक्षाच्या बैलबंडी मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक             गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूक-महाआघाडीचा दणदणीत विजय, भाजपप्रणित शिक्षण मंचचा दारुण पराभव             राज्यात गत वर्षभरात तब्बल १४ हजार ३६८ बालमृत्यू-विधानसभेत आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची माहिती             शेतकरी नष्ट व्हावा, असे सरकारला वाटते काय-विधीमंडळातील स्थगन प्रस्तावावर अजित पवार यांचा सरकारला सवाल           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

१२ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्यपदक जाहीर

Monday, 14th August 2017 08:09:10 AM

गडचिरोली, ता.१४: नक्षल्यांशी प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या १२ पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक जाहीर झाले असून, त्यात तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्यासह शहीद जवान दोगे आत्राम व स्वरुप अमृतकर यांचाही समावेश आहे.

पोलिस शौर्यपदक जाहीर झालेल्यांमध्ये तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.राजकुमार(भापोसे), शहीद दोगे डोलू आत्राम(मरणोत्तर), शहीद स्वरुप अशोक अमृतकर(मरणोत्तर), सहायक पोलिस निरीक्षक नितीन अंकुश माने, हेडकॉन्स्टेबल मल्लेश पोचम केडमवार, पोलिस नाईक जितेंद्र मोतीराम मारगाये, कॉन्स्टेबल गजेंद्र हिराजी सौंजाळ, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भिमराव काळे, पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल प्रभाकर कदम, पोलिस उपनिरीक्षक विजय रमेशराव रत्नपारखी, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद रंगनाथ भिंगारे व हेडकान्स्टेबल मोतीराम बक्का मडावी यांचा समावेश आहे. पोलिस नाईक दोगे डोलू आत्राम, कान्स्टेबल स्वरुप अशोक अमृतकर हे २२ मार्च २०१५ रोजी एटापल्ली तालुक्यातील जांभीया-गट्टा परिसरातील मुसफर्शी जंगलात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SD4PE
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना