गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

सरपंच संघटना लढविणार आरमोरी विधानसभेची जागा

Saturday, 20th September 2014 05:33:15 AM

 

गडचिरोली,ता़२०
कोरची हा जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका असतानाही तो विकासापासून कोसो दूर राहिला़ याविषयीची नाराजी व्यक्त करीत सरपंच संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीत उडी घेण्याचा निर्धार केला असून, आरमोरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवार उभा करण्याचा मानस व्यक्त केला आहे़ 

काल (ता.१९) कोरची येथील त्रिमूर्ती वाचनालयात सरपंच संघटनेची सभा घेण्यात आली़ या सभेत मागील पाच वर्षांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला़ विकासाबाबत लोकप्रतिनिधी उदासीन असल्याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली़ यावेळी सरपंच संघटना तालुक्यात करीत असलेल्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली़ आरोग्य, शिक्षण, रस्ते व अन्य समस्या सोडविण्यासाठी सरपंच संघटनेच्यावतीने आंदोलने, मोर्चे, चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून सरपंच संघटनेने कामे केली आहेत. मात्र, ही कामे करीत असताना कोणत्याही राजकीय पक्षाने सहकार्य केले नाही. तसेच राजकीय पुढाºयांनीही तालुक्यातील समस्यांकडे लक्ष दिले नाही. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी कोरची तालुक्यातील लोकांची कामे तळमळीने केली नाही, याविषयी सरपंच संघटनेने संताप व्यक्त केला़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याचे सभेत ठरविण्यात आले़ सभेला संघटनेचे अध्यक्ष सियाराम हलामी, सचिव नंदकिशोर वैरागडे, मेघशाम जमकातन, प्रतापसिंग गजभिये, हेमंत मानकर, तिलक बागडेहरिया, दामसाय जाळे, सुमन हलामी, धनाबाई मडावी, सविता मडावी, हिराराम सयाम, तुलाराम मडावी, अरुण निकोडे, धनिराम हिळामी, सुरेश उईके, गंगाराम कल्लो, राजाराम नैताम, सुग्रीव पुडो, दौलत कुमरे, रामसुराम काटेंगे, भजन मोहुर्ले, बावनथडे, बस्तर हलामी यांच्यासह तालुक्यातील, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. वरील सर्व सरपंच व उपसरपंच हे कोणत्या तरी राजकीय पक्षांशी यापूर्वी जुळलेले होते़ मात्र, आता त्यांनी राजकीय मतभेद विसरून स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला, हे विशेष. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HC550
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना