शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

चामोर्शी-भेंडाळा मार्गावर अपघात; १ ठार, ८ गंभीर

Sunday, 21st September 2014 08:23:19 AM

गडचिरोली, ता़ २१ : अस्थिविसर्जन करून परत येत असताना चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात १ ठार, तर ८ जण गंभीर झाल्याची घटना आज(ता़२१) चामोर्शी-भेंडाळा मार्गावरील डांबर प्लांटजवळ दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली़ राजन्ना रामन्ना संगावार(५५)रा़अड्याळ असे मृत इसमाचे नाव आहे़जामगिरी येथील कोपुलवार परिवारातील नागरिक आज मार्कंडादेव येथे चारचाकी वाहनाने अस्थिविसर्जनासाठी गेले होते़ मात्र, परत येत असताना चामोर्शी-भेंडाळा मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले़ या अपघातात राजन्ना संगावार जागीच ठार झाले़ या अपघातात नंदाबाई कोपुलवार, सीताराम कोपुलवार,शशीकला कोपुलवार, सुनील कोपुलवार, मनोहर कोपुलवार, लीलाबाई कोपुलवार, वर्षा कोपुलवार, रेखा कोपुलवार रा़सर्व जामगिरी हे गंभीर जखमी झाले़ किरकोळ जखमींमध्ये कवडू कोपुलवार, राजू कोपुलवार, संजय बहिरेवार, प्रशांत कोपुलवार, नीळकंठ भोयर, शांताबाई कोपुलवार, श्रीकांत कोपुलवार, मयूर बुरे, सुशांत कोपुलवार, गीता कोपुलवार व तन्मय कोपुलवार यांचा समावेश आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8445E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना