शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

प्रा़ नीरज खोब्रागडे यांना दुसर्‍यांदा पीएचडी बहाल

Monday, 22nd September 2014 05:32:37 AM

 
गडचिरोली,ता़२२
आलापल्ली येथील राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत प्रा़ नीरज खोब्रागडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अलिकडेच ग्रंथालय माहितीशास्त्र विषयात पीएचडी बहाल केली आहे़ ही त्यांची दुसरी पीएचडी असून, यापूर्वी २०१० मध्ये त्यांनी वाणीज्य विषयात पीएचडी मिळवली होती़

‘कॉन्ट्रीब्युशन अँड अचिव्हमेंट आॅफ एलआयएस प्रोफेशनल्स आॅफ आरटीएम नागपूर युनिव्हर्सिटी-अ‍ॅन एक्सक्लुसिव्ह स्टडी ’हा त्यांच्या ग्रंथालय माहितीशास्त्रातील पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता़ प्रा़ डॉ़ खोब्रागडे यांचे ३८ संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रसिद्ध झाले असून, ११ आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्येही त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत़ त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध आहेत़ प्रा़ डॉ़ नीरज खोब्रागडे हे कर व गुंतवणूक सल्लागार तसेच पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत़ दोन विषयात पीएचडी मिळविणारे डॉख़ोब्रागडे हे गडचिरोली जिल्ह्यातील पहिले प्राध्यापक आहेत़ डॉ ख़ोब्रागडे यांना दुसर्‍यांदा पीएचडी मिळाल्याबद्दल प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व चाहत्यांनी त्यांचे अभ्‍िानंदन केले आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ZYOE5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना