गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

उमेदवारी अर्ज भ्ररण्याचा दुसरा दिवसही कोरडा

Monday, 22nd September 2014 05:40:33 AM

 
गडचिरोली,ता़२२
१५ आॅक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभ्रा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भ्ररण्याच्या आजच्या(ता़२२)दुसर्‍या दिवशी कोणत्याही राजकीय पक्षाच्या वा अपक्ष उमेदवाराने अर्ज भ्ररला नाही़ त्यामुळे दुसरा दिवसही कोरडा गेला़

२० सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भ्ररण्यास प्रारंभ्र झाला आहे़ मात्र त्या दिवशी कुणीही अर्ज भ्ररला नाही़ त्यानंतर २१ सप्टेंबरला रविवार असल्याने सुटी होती़ आज दुसर्‍या दिवशीही कुणीच अर्ज भ्ररला नाही़ मात्र, आज ४५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली़ आरमोरी विधानसभ्रा क्षेत्रातून ३ जणांनी १० अर्ज नेले़ गडचिरोली क्षेत्रातून ९ जणांनी २९ अर्ज, तर अहेरी क्षेत्रातून २ जणांनी ६ अर्ज खरेदी केले़ पहिल्या दिवशी ६३ अर्जांची विक्री झाली होती़ वरिष्ठ पातळीवर युती आणि आघाडीत तणाव असल्याने अजूनही उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा केली जात आहे़ त्यामुळे उमेदवार धास्तावले असून, कार्यकर्त्यांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
932R4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना