गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

हलबा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला विराट मशाल मोर्चा

Saturday, 18th November 2017 07:01:46 AM

गडचिरोली, ता.१८: हलबा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ व हलबा जमात संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज हलबा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मशाल मोर्चा काढला. 

सुरुवातीला इंदिरा गांधी चौकातील सभागृहात समाजबांधवांची सभा झाली. त्यानंतर आमदार विकास कुंभारे, राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४२ नुसार हलबा जमातीला आरक्षण देण्यात आले आहे. परंतु राज्य व केंद्र शासनाकडून मागील २५ वर्षांपासून हलबा समाजातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी व युवक, युवतींना शासकीय योजनांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे समाज हलाखीचे जीवन जगत असून, हा अन्याय दूर करावा, अशी मागणी हलबा समाजबांधवांनी केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर आदिवासी विकास राज्यमत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात महादेवराव कुंभारे, सुचिता धकाते, आरती बोकडे, नीलिमा तळोधीकर, किरण निखारे, वैशाली हुस्के, वैशाली धकाते, शीला सोरते, भारती बोकडे, सुषमा नंदनवार, सरिता कुंभारे यांच्यासह विविध भागातून आलेले हलबा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0U1CO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना