शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ३ वर्षांचा सश्रम कारावास

Tuesday, 28th November 2017 06:17:31 AM

गडचिरोली, ता.२८: दुपारी शाळेकडे खेळावयास गेलेल्या अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राकेश बाबूराव देवईकर(२६)रा.हळदवाही, ता.चामोर्शी असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना १६ डिसेंबर २०१६ ची आहे. घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी शाळेकडे खेळावयास गेली होती. यावेळी राकेश देवईकर हा युवक तिच्याजवळ गेला. त्यानंतर त्याने पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात नेले आणि विनयभंग केला. पीडित मुलीने या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर घोट पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी आरोपी राकेश देवईकर याच्यावर भादंवि कलम ३५४(ब) व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमाच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

काल(ता.२७) या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने पीडित मुलगी व अन्य साक्षदारांचे बयाण नोंदवून, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी राकेश देवईकर यास भादंवि कलम ३५४(ब) अन्वये ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार  रुपयांचा दंड आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमान्वये ३ वर्षाचा कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7400K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना