सोमवार, 19 फेब्रुवारी 2018
लक्षवेधी :
  सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जनजागृती अभियान-राकाँच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांची माहिती             मोटारसायकल अपघातात तीन जण जागीच ठार, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील देवडी फाट्यावरील घटना             पोलिस भरतीच्या जागा वाढवा, जीडीसीसी बँकेतील गुणांची अट रद्द करुन आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन-सुशिक्षित बेरोजगारांचा इशारा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात जमिनी व प्लॉटस् विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास

Thursday, 30th November 2017 09:33:53 PM

गडचिरोली, ता.१: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. तौशिफ हबीब शेख रा.जवाहर वॉर्ड, देसाईगंज, असे दोषी इसमाचे नाव आहे.

तौशिफ शेखचा पीडित मुलीच्या घरापुढे पानठेला होता. १ जानेवारी २०१५ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत तौशिफ शेख याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक शोषण केले. यामुळे मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तौशिफने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. या बाबीची पोलिसांत तक्रार केल्यास जीवानिशी ठार करेन, अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली. पुढे तिने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तौशिफ शेख याच्याविरुद्ध भादंवि कलात३१३ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास १७ फेब्रुवारी २०१६ रोजी अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

काल(ता.३०) या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने पीडितेचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी तौशिफ शेख यास १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N0E52
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना