गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

देसाईगंज येथे 'आशा' दिवस साजरा

Friday, 1st December 2017 06:52:33 AM

देसाईगंज, ता.१: येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात 'आशा' दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व 'आशा' स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रणय कोसे यांनी आशा स्वयंसेविकांना नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. नवजात बालकांना होणारा निमोनिया, जंतुसंसर्ग, हायपोथर्मिया, संक्रमण, स्तनपान समस्या, अधिक वजनाची बालके, कमी दिवसाची बालके याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

'आशा' दिवसानिमित्त रांगोळी स्पर्धा, कविता वाचन, लेखन व सामान्य ज्ञान स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. त्यात सर्व 'आशा' स्वयंसेविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यातील विजेत्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिवाय ज्या 'आशा' स्वयंसेविकांच्या कार्यक्षेत्रात माता व नवजात बालकांचे मृत्यु झाले नाही, अशा आशा स्वयंसेविकांनाही प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलिप कांबळे, लेखापाल चंद्रकांत मेश्राम, तालुका समूह संघटिका कविता आठवले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला दरडमारे, चहारे, आढाव, तारकेश्वरी कांबळे, नीता दांडेकर व 'आशा' स्वयंसेविका उपस्थित होत्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RA4F7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना