शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018
लक्षवेधी :
  पत्नीची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाचा निवाडा             भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती              नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या-एटापल्ली तालुक्यातील घटना             सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

राष्ट्रवादी काँग्रेसने गडचिरोलीच्या एसडीओ कार्यालयावर काढला हल्ला बोल मोर्चा

Tuesday, 5th December 2017 08:49:06 AM

गडचिरोली, ता.५: केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सरकारच्या विरोधात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चकऱ्यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत सरकार गप्प का असा प्रश्न विचारत सरसकट कर्जमाफी द्या, महागाई कमी करा, अशा सरकारविरोधात घोषणा देत एसडीओ कार्यालयाकडे आगेकूच केली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चात रायुकाँ जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मनिषा खेवले, फहीम काझी, विजय कावळे, विवेक बाबनवाडे, तुकाराम पुरणवार, विजय धकाते, अजय कुंभारे, कबिर शेख, इस्माईल शेख, बरकत सय्यद, शामीर शेख, गुमानसिंग सुंदरसिंग, विजय चंदूलवार, राजू डांगेवार, ममता चिलबुले, संजय कोचे, दीपाली गिरडकर, मनिषा सजनपवार, यामिनी कुळसंगे, डॉ.कोहाड, संगीता कांबळे, माया खेवले, अनुसया गेडाम, मोरेश्वर भांडेकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2M1K0
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना