शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018
लक्षवेधी :
  पत्नीची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाचा निवाडा             भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती              नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या-एटापल्ली तालुक्यातील घटना             सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

अवैध दारुविक्रेत्यास ३ वर्षांचा कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा

Tuesday, 5th December 2017 09:12:38 AM

गडचिरोली, ता.५: अवैधरित्या दारु विकणाऱ्या एका इसमास येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी ३ वर्षांचा साधा कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दीपक रमेश भुरले, र.हनुमान वॉर्ड, गडचिरोली, असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना यंदाचीच आहे. १७ मार्च २०१७ रोजी पोलिसांनी दीपक भुरले याच्या राहत्या घराची झडती घेतली असता न्हाणीघरात आयबी कंपनीच्या विदेशी दारुच्या १३० बाटल्या व मॅक्डोवेल कंपनीच्या २६ बाटल्या अशी एकूण ४६ हजार ८०० रुपयांची दारु आढळून आली होती. ही दारु विनापरवाना असल्याचे निष्पन्न होताच पोलिस हवालदार राजेंद्र तितिरमारे यांच्या फिर्यादीवरुन  दीपक भुरले याच्यावर मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार हरिदास राऊत यांनी गुन्ह्याचा तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले. 

आज या प्रकरणाचा निकाल लागला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)अन्वये आरोपी दीपक भुरले यास ३ वर्षांचा साधा कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हवालदार यशवंत मलगाम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
CU168
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना