बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

एड्सग्रस्त व विकलांगांना मुख्य प्रवाहात आणा:न्या.सिंघेल

Wednesday, 6th December 2017 05:30:15 AM

देसाईगंज, ता.६: एड्सग्रस्त व विकलांग व्यक्तींना राज्यघटनेने कायद्यान्वये काही अधिकार दिलेले असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या.सिंघेल यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज येथे 'एड्स व विकलांगता' या विषयावर आयोजित कायदेविषयक शिबिराच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनिष धकाते, पत्रकार विलास ढोरे, प्रा.दिलीप कहुरके, अॅड.पिलारे, अॅड.गुरु उपस्थित होते. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. न्या.सिंघेल यांनी बाबासाहेबांचे कायदेविषयक धोरणावर प्रकाश टाकला. तसेच एड्सग्रस्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे सांगून एड्स व विकलांग व्यक्तींसाठी असलेल्या कायदेविषयक अधिकारांबाबत मार्गदर्शन केले. एड्स होऊ नये यासाठी शिलाचे आचरण महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रणय कोसे यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SR6RW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना