गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दारुसाठी पत्नीस जीवंत जाळणाऱ्या नवरोबास जन्मठेपेची शिक्षा

Wednesday, 6th December 2017 07:20:15 AM

गडचिरोली, ता.६: दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला जीवंत जाळणाऱ्या नवरोबास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेश सोमाजी भोयर रा.खुर्सा ता.गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना १४ जून २०१५ ची आहे. या दिवशी आरोपी सुरेश भोयर याने पत्नी सुचेता हिला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु सुचेताने पैसे देण्यास नकार दिल्याने सुरेशने तिच्याशी भांडण करुन मारहाण केली. त्यानंतर त्याने सुचेताच्या अंगावर केरोसीन ओतून आग लावली. यामुळे सुचेता पूर्णपणे जळाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्युपूर्व बयाणात सुचेताने आपणास पतीने जाळल्याचे पोलिसांना सांगितले होते. यावरुन गडचिरोली पोलिसांनी आरोपी सुरेश भोयर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक वैभव माळी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने पीडितेचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी सुरेश भोयर यास जन्मठेप व ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ३ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
119GM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना