शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018
लक्षवेधी :
  पत्नीची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाचा निवाडा             भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती              नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या-एटापल्ली तालुक्यातील घटना             सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

वेतनश्रेणीतील अन्यायामुळे वनकर्मचारी संतप्त, ११ डिसेंबरला धरणे आंदोलन

Thursday, 7th December 2017 12:58:59 AM

गडचिरोली, ता.७: वारवांर मागणी करुनही राज्य शासनाने वेतनश्रेणीतील तफावत दूर न केल्याने वनकर्मचारी संतप्त झाले असून, वनकर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन येत्या ११ डिसेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पेंदोरकर, महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर व कास्ट्राईब वनकर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोंडवले यांनी संयुक्तरित्या जिल्हाधिकारी, मुख्य वनसरंक्षक व पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वनरक्षक व वनपालांच्या अन्यायकारण वेतनश्रेणीत सुधारणा करावी, १ नोव्हेंबर २००५ नंतर वनविभागाच्या सेवेत रुजू झालेल्या वनकर्मचाऱ्यांसाठी संरक्षण विभागाच्या धर्तीवर १९८२ ची जुनी पेंशन योजना लागू करावी, एकस्तर वेतन निश्चितीमधील अनियमितता दूर करावी, कुटुंब आरोग्य योजना लागू करावी, पोलिस विभागाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता, अतिकालीन भत्ता, आहार भत्ता लागू करावा, ११ दिवसाच्या संपकाळातील अर्जित रजा मंजूर कराव्या, पोलिस विभागाप्रमाणे वन्यजीव संरक्षणादरम्यान मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक भरपाई देण्यात यावी, मृत कर्मचाऱ्याच्या पाल्यास तत्काळ अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी इत्यादी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक व वनपालांनी महाराष्ट्र वनसंहिता आणि शासकीय दस्तऐवजात नमूद कर्तव्य व जबाबदारी वगळता अन्य तांत्रिक कामे तसेच मनरेगा योजनेच्या कामांवर बहिष्कार टाकून पीडीए व जीपीएस यंत्र परत करण्याचा ठराव पारित केला आहे. आम्ही दररोज ८ तासच काम करु आणि अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा न झाल्यास भविष्यात १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला सहकार्य करणार नाही, या निर्णयाप्रत वनकर्मचारी संघटना आल्या आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4V5A8
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना