सोमवार, 11 डिसेंबर 2017
लक्षवेधी :
  नक्षल्यांनी मोबाईल टॉवर जाळला-एटापल्ली तालुक्यातील रोपी येथील घटना             सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांची केंद्रीय अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती             अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अंकिसा येथील वाळू कंत्राटदार अजय येनगंटी यास अटक              वनजमिनीच्या पट्ठ्यांसाठी ग्रामसभांनी कोरचीत केले रास्तारोको आंदोलन             विदर्भबंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद, चामोर्शीत चक्काजाम             गोंडवाना विद्यापीठ-सिनेट निवडणुकीत ५१ टक्के मतदान             वेतनश्रेणीतील अन्यायाविरोधात वनकर्मचाऱ्यांनी केला एकदिवसाचा लाक्षणिक संप           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

कोरची तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर

Thursday, 7th December 2017 06:45:44 AM

गडचिरोली, ता.७: जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या कोरची तालुक्यातील जांभळी, सातपुती व बेलगांव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

निवडणुकीची नोटीस २४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिध्द झाली असून, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत राहील. १२ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजतापासून नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल.  नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०१७ ही असून, या दिवशी दुपारी ३ वाजता पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल, तसेच निवडणूक लढविणाऱ्या  उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. आवश्यक असल्यास २६ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजतापर्यंत निवडणूक घेण्यात येईल. २७ डिसेंबरला सकाळी १० वाजतापासून तहसील कार्यालय कोरची येथे मतमोजणी करण्यात येणार आहे. २८ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8O52F
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना