शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गोंडवाना विद्यापीठ-पदवीधर सिनेट निवडणुकीत ५१ टक्के मतदान

Sunday, 10th December 2017 07:38:09 AM

गडचिरोली, ता.१०: गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटसाठी आज घेण्यात आलेल्या निवडणुकीत ५१ टक्के मतदान झाले.

गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा व विविध अभ्यासमंडळांची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी प्राधिकरण व अभ्यासमडळांवर काही सदस्य अविरोध निवडून आले आहेत. 

पदवीधर सिनेटसाठी खुला प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला प्रवर्गातील ५२ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात होते. गडचिरोली जिल्ह्यातील १४ व चंद्रपूर जिल्ह्यातील २२ अशा एकूण ३६ मतदान केंद्रांवर आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत मतदान घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी सहकार्य केले. बहुतांश सर्वच केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत ५१ टक्के मतदान झाले. सिनेट उमेदवारांना पदवीप्राप्त नागरिक मतदान करतात. त्यासाठी अभाविप, शिक्षक महाआघाडी व अन्य संघटनांनी कंबर कसून उमेदवार रिंगणात उतरविले होते. परंतु मतदार सुशिक्षित असूनही पाहिजे त्या प्रमाणात मतदानासंदर्भात जनजागृती करण्यात न आल्याने अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. परिणामी केवळ ५१ टक्के मतदान झाले. अहेरी उपविभागातील पाच तालुक्यांमध्ये केवळ ५८६ मतदार होते. त्यापैकी ४२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे त्या भागात सर्वाधिक ७३ टक्के मतदान झाले.

सिनेट प्राचार्यसाठी ९३ टक्के, सिनेट मॅनेजमेंटसाठी ९२ टक्के, सिनेट टिचरसाठी ९० टक्के, अकॅडेमिक टिचरसाठी ८२ टक्के व बोर्ड ऑफ स्टडीजसाठी ९० टक्के मतदान झाले.

बुधवारी(ता.१३) सकाळी ९ वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव दीपक जुनघरे यांनी दिली. या निवडणुकीसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभारही श्री.जुनघरे यांनी मानले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9QT4X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना