गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सुदृढ आरोग्य हाच आनंदी जीवनाचा मूलमंत्र:डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार

Monday, 11th December 2017 05:16:27 AM

गडचिरोली, ता.११: अज्ञान व गरिबीमुळे आदिवासी भागात अंधश्रद्धा असून, पुजाऱ्याकडूनच आजारी व्यक्तीवर उपचार केले जातात. परिणामी अकारण मृत्युला सामोरे जावे लागते. या अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी आरोग्य शिक्षणाची गरज असून, सुदृढ आरोग्यासाठी डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावा, असे आवाहन कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार यांनी केले. पुस्टोला येथे पोलिस विभागाच्या वतीने आयोजित जनजागरण मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य मैना कोवाची, सरपंच सुरेश परसे, पोलिस पाटील श्री.करंगामी, चित्ररेखा रायपुरे, कटकेलवार, सावजी पदा, रावजी आतला, सीआरपीएफचे श्री.रामचंद्रा, राजू पदा, येशू गावडे, आर.एम.पाटेवार, एस.बी.कसनवार, चंद्रशेखर धुर्वे, सौ.कल्लो, पोलिस उपनिरीक्षक जी.के.खराडे, एस.जे.लोंढे, करुणा चौगुले उपस्थित होते.

यावेळी डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार यांनी मातृत्व वंदन योजना, जननी सुरक्षा योजना, भाग्यश्री योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना व अन्य योजनांविषयी माहिती दिली. तसेच लसीकरण, कुटुंबकल्याण, अंधत्व निवारण कार्यक्रम, क्षयरोग, कुष्ठरोग, हिवताप, हृदयरोग, तंबाखू खाण्यामुळे होणारे रोग इत्यादीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ताप आला तर केवळ पूजा-अर्चा केल्याने तो जात नाही, तर त्यासाठी रक्ततपासणी करुन हिवताप आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. अनेक जण पूजा करीत राहिल्याने मेंदुज्वर होऊन रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. हे टाळण्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ.डोंगरवार यांनी केले. यावेळी आरोग्य शिबिर घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिवाय त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आले.

शिबिरासाठी आरोग्यसेविका कसनवार, श्री.पाटेवार, चंद्रशेखर धुर्वे, मदन चौधरी आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K1YU0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना