शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कामासूर पहाडावरील चकमकीत एक नक्षलवादी ठार

Tuesday, 12th December 2017 07:07:40 AM

गडचिरोली, ता.१२: सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला होता. दरम्यान, पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान आज कल्लेडनजीकच्या कामासूर जंगलात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबरच्या सकाळी कल्लेड जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाशी झालेल्या चकमकीत ५ महिला व २ पुरुष नक्षली ठार झाले होते. या घटनेनंतर नक्षलवादी देचलीपेठा उपपोलिस ठाण्यांतर्गत कामासूर व येलाराम गावांच्या जंगलात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविणे सुरु केले. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कामासूर पहाडावरील जंगलात नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार करताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. तसेच एक ३०३ रायफल, काही राऊंड व नक्षल्यांचे दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले. या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OHHHY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना