मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

पोलिस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 19th December 2017 08:58:30 AM

गडचिरोली, ता.१९: मित्रावर दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी एका वाहनचालकाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज धानोरा येथील पोलिस उपनिरीक्षकासह एका खासगी इसमास रंगेहाथ पकडून अटक केली. नरेंद्र आश्रृबा मुंडे(२९), असे पोलिस उपनिरीक्षकाचे, तर मुश्ताक रहीम कुरेशी(४०) असे खासगी इसमाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा वाहनचालक व मालक आहे. त्याचा मित्र जावेद पठाण याच्यावर धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सहआरोपी बनवून अटक न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे याने तक्रारकर्त्यास २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो १० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज धानोरा येथे सापळा रचला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे याने तक्रारकर्त्याकडून खासगी इसम मुश्ताक कुरेशी याच्या मार्फतीने १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. यावरुन एसीबीने नरेंद्र मुंडे व मुश्ताक कुरेशी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१२,१३(१)(ड) व १३(२) अन्वये धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक रोशन यादव, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, मिलिंद गेडाम, महेश कुकडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तवाडे, तुळशीदास नवघरे व घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BURYP
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना