मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

धोबी समाजातर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन

Wednesday, 20th December 2017 12:33:47 AM

गडचिरोली, ता.२०: थोर संत कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज धोबी, परीट, वरठी सेवा संघटनेतर्फे गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

धोबी समाज संघटनेचे नेते तथा नगर परिषदेचे माजी सभापती विजय गोरडवार यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन तसेच दीप प्रज्ज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुभाष रोहनकर, संतोष आकनूरवार, दिवाकर ताजने, सचिन बारसागडे, प्रभाकर राहुलवार, विलास केळझरकर, राजेश दासरवार, मोरेश्वर मानपल्लीवार, प्रवीण ताजने, दामोधर यम्पलवार, रमेश चतुरकर, महिला धोबी संघटनेच्या अध्यक्ष संगीता गडपायले, सचिव मंगला केळझरकर, निलीमा केळझरकर, अनिता कोल्हटवार, कल्पना चतुरकर, वैशाली ताजने, सपना बारसागडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अशोक कोल्हटवार, महेश कोतकोंडावार, नितीश केळझरकर, पंकज केळझरकर, अंकलेश रोहनकर, माणिक केळझरकर, बंटी केळझरकर यांनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MCWA0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना