गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आलकन्हार येथे पेसा दिनानिमित्त जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन

Wednesday, 20th December 2017 04:38:48 AM

गडचिरोली,ता.२०: धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील आलकन्हार ग्रामसभा आणि झाडापापडा पारंपरिक इलाका गोटूल समितीच्या वतीने राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त गुरुवारी (ता.२१) सकाळी ११ वाजता चर्चासत्र आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन  करण्यात आलेले आहे. 

माजी आमदार हिरामण वरखडे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अँड.लालसू नोगोटी, सैनू गोटा, श्रीनिवास दुल्लमवार, भामरागड पं.स.सभापती सुकराम मडावी, पं.स.सदस्य रोशनी पवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

 यावेळी मागील २० वर्षातील पेसा कायद्याच्या फलनिष्पत्तीवर रामदास जराते, बावसू पावे, जयश्री वेळदा हे भाष्य करणार आहेत. या चर्चासत्रात धानोऱ्याचे तहसीलदार महेंद्र गणवीर, जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शालिक धनकर, जिल्हा पेसा समन्वयक नन्नावरे, नंदूभाऊ मट्टामी, कोतुराम पोटावी, संतोष सोयाम, बालाजी गावडे, गंगाराम आतला, पं.स.सदस्य शीला गोटा, प्रेमिला कुड्यामी, वसंत पोटावी हे पारंपरिक इलाक्यांच्या वतीने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
41J5F
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना