शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

भाजपचे चंद्रपूर जिल्हा सोशल मीडियाप्रमुख अमोल कोंडबत्तुनवार यांचे अपघातात निधन

Friday, 29th December 2017 09:14:50 PM

गडचिरोली, ता.३०: भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सोशल मीडियाप्रमुख अमोल कोंडबत्तुनवार यांचे आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नागभिड-नागपूर मार्गावरील भुयार गावाजवळ अपघातात निधन झाले.

राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले अमोल कोंडबत्तुनवार हे मागील दोन वर्षांपासून भाजपचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख म्हणून काम करीत होते. मूळचे सावली येथील रहिवासी असलेले अमोल कोंडबत्तुनवार हे भाजपच्या बातम्या तत्काळ सोशल मीडियाद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत होते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून विश्रांती घेत होते. प्रकृती बरी झाल्यानंतर आज ते चंद्रपूर जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या स्वागताची तयारीही कार्यकर्त्यांनी करुन ठेवली होती. त्यांच्या स्वागतासाठी अमोल कोंडबत्तुनवार हे एमएच ३४-७००१ क्रमांकाच्या स्वीफ्ट डिझायर गाडीने नागपूरकडे जात असताना सकाळी ६ वाजता भुयार गावाजवळ अपघात झाला. यात ते जागीच ठार झाले. अमोल हे पद्मशाली फाउंडेशलचे संचालक, सावलीचा राज गणेश मंडळाचेअध्यक्ष व स्पंदन संस्थेचेही सदस्य होते. अमोल कोंडबत्तुनवार हे गडचिरोलीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांचे पुतणे असून, राज्यातील वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांचे मामेभाऊ आहेत. अवघ्या तरुण वयात अमोलचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अमोलचे अपघाती निधन होणे ही बाब मनाला चटका लावणारी असून, पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. अमोलच्या निधनामुळे मुनगंटीवार यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5GUO7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना