शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जिल्हाधिकारी रंगा नायक यांचे स्थानांतरण, शेखर सिंह गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी

Friday, 29th December 2017 09:27:39 PM

गडचिरोली, ता.३०: येथील जिल्हाधिकारी एएसआर रंगा नायक यांचे स्थानांतरण झाले असून, शेखर सिंह यांची गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने काल ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात सध्याचे जिल्हाधिकारी एएसआर नायक यांचाही समावेश आहे. श्री.नायक यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या आयुक्तपदी नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. श्री.नायक यांनी १६ मे २०१६ रोजी गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हाती घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांची गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी राहिलेले अतुल पाटणे यांची वस्त्रोद्योग महामंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EU416
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना