बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

'थर्टी फर्स्ट'चा असर: तीन वेगवेगळ्या अपघातात ५ जण गंभीर

Sunday, 31st December 2017 06:33:05 AM

कुरखेडा, ता.३१: सारा देश मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संध्याकाळची वाट पाहत असताना आज कुरखेडा तालुक्यात सकाळपासूनच 'थर्टी फर्स्ट'चा असर दिसून आला. तालुक्यात एकाच ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्यात अपघातांत ७ जण जखमी झाले असून, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींपैकी बहुतांश जण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

नैयाज हैदर सय्यद(२२),रा.वडेगाव व सिरगल मुजाहिद्दीन शेख(२३) रा.मालेगाव हे मोटारसायकलने कुरखेड्याकडे येत असताना आज सकाळी १०.३० वाजता नान्ही फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात दोघेही जण गंभीर जखमी झाले. दुसरा अपघात दुपारी ४ वाजताच्या सुमारास झाला. सम्यक किशोर गजभिये(१६), प्रतीक देविदास भानारकर(१६) व आकाश खुशाल रामटेके(१६) रा.कुरखेडा हे केशोरी येथून मोटारसायकलने कुरखेड्याकडे येत असताना नान्हीच्या वळणावर अपघात झाला. यात सम्यक गजभियेच्या कानातून रक्तस्त्राव झाला, तर प्रतीक भानारकरचा हात मोडला. हे तिघेही शालेय विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

तिसरा अपघात ५ वाजता झाला. कुणाल कार(१८) व मनिष नाकाडे रा.कुरखेडा हेही मोटारसायकलने केशोरीवरुन येत असताना नान्हीजवळच मोटारसायकल घसरुन अपघात झाला. यात ते जखमी झाले. जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करुन प्रथमोपचार करण्यात आले. गंभीर जखमींना गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपच्या ओबीसी आघाडीचे विभागीय सचिव विलास गावंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे व शिवसेना तालुकाप्रमुख आशिष काळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KSIO4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना