शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

३ वर्षांपासून फरार नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक

Sunday, 31st December 2017 07:05:13 AM

गडचिरोली, ता.३१: विविध गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर ३ वर्षांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या एका ज्येष्ठ नक्षल्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. प्रवीण उर्फ चंद्रिका जेठुराम राऊत(४२)रा.घोडसर, ता.एटापल्ली असे अटक केलेल्या नक्षल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रिका राऊत हा १९९१ मध्ये चामोर्शी दलममध्ये भरती झाला होता. पुढे १९९३ ते ९९ पर्यंत तो एका गुन्ह्यात चंद्रपूर कारागृहात शिक्षा भोगत होता. तेथून जामीनावर सुटल्यानंतर २००० मध्ये चंद्रिका एटापल्ली दलममध्ये भरती झाला. २००२ मध्ये त्याची एटापल्ली दलममधून चामोर्शी दलममध्ये बदली करण्यात आली. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. १ डिसेंबर २०१४ रोजी गट्टा(फु) पोलिस मदत केंद्रातील पोलिसांना नाकाबंदीदरम्यान एक संशयित इसम आढळून आला. त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव चंद्रिका जेठुराम राऊत असे सांगितले होते. पोलिसांनी त्यास गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयात आणले. परंतु त्याच दिवशी विचारपूस सुरु असताना रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन पळून गेला. तेव्हापासून तो पोलिसांना वाँटेड होता. आज पोलिसांनी त्यास अटक केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U0PS9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना