मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

सव्वातीन लाखांचे सागवान जप्त, तस्करांची टोळी जेरबंद

Tuesday, 2nd January 2018 05:35:02 AM

गडचिरोली, ता.२: सिरोंचा तालुक्यातून तेलंगणा राज्यात अवैधरित्या सागवान लाकडे वाहून नेणारी टोळी वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केली असून, त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची लाकडे जप्त करण्यात आली आहेत.

काल रात्री वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना मर्रीगुडम जंगलातून एपी ३६ एक्स ५४३६ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. वनाधिकाऱ्यांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यात ट्रकभर सागवान लाकडे आढळून आली. ही लाकडे ६.४७ टनमीटरची असून, १११ नग आढळून आले. बाजारात या लाकडांची किंमत ३ लाख १८ हजार ३५२ रुपये एवढी आहे.

ही सागवान लाकडे मर्रीगुडम जंगलातून सिरोंचामार्गे तेलंगाणातील परिकोट येथे नेण्यात येत होती. याप्रकरणी स्वानंद समय्या बंदुला रा.परिकोट, पोचम रामय्या गावडे रा.मरिगुडम, श्रावणकुमारा लक्ष्मीनर्सय्या कटकोजी रा.हमकोंडा, गुंडेचाईल रामस्वामी रा.पंचापूर, लैशेट्टी समय्या राजलिंगू रा.कमानपूर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य तिघे फरार होण्यात यशस्वी झाले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1TJMX
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना