बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली, देसाईगंज नगर परिषद सभापतिपदाची निवडणूक २३ जानेवारीला

Thursday, 18th January 2018 07:56:31 PM

गडचिरोली, ता.१९: जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर परिषदांच्या स्थायी समित्या व विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी २३ जानेवारीला संबंधित नगर परिषदांच्या सभागृहांमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांच्या स्थायी समित्या व विषय समित्यांच्या सभापतींना नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून, त्यांचा कालावधी २४ जानेवारीला संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन विभागाने सभापती निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार गडचिरोली नगरपरिषदेसाठी २३ जानेवारीला सकाळी १० वाजता गडचिरोली नगर परिषद सभागृहात, तर देसाईगंज नगर परिषदेसाठी देसाईगंज येथील नगर परिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर हे पीठासीन अधिकारी म्हणून, तर सहायक म्हणून मुख्याधिकारी कृष्णा निपाणे उपस्थित राहतील. देसाईगंज येथे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तर सहायक म्हणून मुख्याधिकारी म्हणून तैमूर मुलाणी उपस्थित राहतील.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6C91U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना