शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शेतकरी, मजूर व बेरोजगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने केले धरणे आंदोलन

Monday, 22nd January 2018 04:31:39 AM

गडचिरोली, ता.२२: शेतकरी, मजूर, महिला व बेरोजगारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, ज्येष्ठ नेते प्रकाश ताकसांडे, मुश्ताक शेख, अब्दूल शेख, जगन जांभूळकर, फहीम काझी, विजय कावळे, प्रभाकर बारापात्रे, विवेक ब्राम्हणवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अल्पसंख्याक समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत करावे, महिला रुग्णालय त्वरीत सुरु करावी, पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी कराव्या इत्यादी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0AJLZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना