गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली नगर परिषदेच्या विषय समित्यांमध्ये खांदेपालट

Tuesday, 23rd January 2018 02:42:01 AM

गडचिरोली, ता.२३: येथे आज झालेल्या नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत भाजपने खांदेपालट करुन नव्या नगरसेवकांना संधी दिली.

आज दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर व मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांच्या उपस्थितीत गडचिरोली नगर परिषदेच्या सभागृहात नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रत्येक विषय समितीच्या सभापतिपदासाठी प्रत्येकी एकच नाव असल्याने सर्वांची निवड अविरोध झाली. बांधकाम समितीच्या सभापतिपदी ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान सभापती आनंद शृंगारपवार यांची पुनर्निवड करण्यात आली. वित्त व नियोजन समितीचे सभापती म्हणून ज्येष्ठ नगरसेवक संजय मेश्राम यांची निवड झाली. पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणून प्रवीण वाघरे, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बालकल्याण सभापती म्हणून रंजना गेडाम यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्याकडे आरोग्य समितीचे सभापतिपद कायम ठेवण्यात आले. स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व प्रशांत खोब्रागडे यांची निवड झाली.

यानंतर आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. गेल्या काही दिवसांपासून कामे होत नसल्याच्या कारणावरुन बहुतांश नगरसेवक नाराज होते. अशातच सभापतिपदाची निवडणूक येऊन ठेपल्याने नगरसेवकांची नाराजी टोकाला पोहचली होती. मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते व अन्य ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुन कौशल्याने मतभेद मिटविल्याने आजची निवडणूक अविरोध पार पडली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
968M1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना